“राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार”; मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते आधीच तुरुंगात आहेत. आता त्यातच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता तुरुंगात जाणार असे ट्वीट केले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. कंबोज यांचा इशारा नेमका कोणत्या नेत्याकडे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुस-या ट्वीटमध्ये 2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे, असा उल्लेख आहे. खरंतर सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव आले होते. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चीट दिल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

( हेही वाचा: दोन रूपयांनी दूध महागलं! ‘या’ तारखेपासून होणार दरवाढ )

तसेच, मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. भारत आणि परदेशातली मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंडसच्या नावाखाली संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्ट्राचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here