राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज सोमवारी नाशिकमधून बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल इन्फेक्शनमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संध्याकाळी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.
(हेही वाचा – शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज)
छगन भुजबळ यांना गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय कार्यक्रमात मास्क वापरताना दिसत होते. मात्र आज अचानक व्हायरल इन्फेक्शनमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घरगुती उपचारही केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी अचानक त्रास वाढल्याने त्यांना बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शरद पवारांना ब्रीच कँडीतून डिस्चार्ज
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. त्या दिवसापासून शरद पवारांवर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. शरद पवारांना २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र पूर्णपणे बरे वाटत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला नव्हता. दरम्यान, पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम या काळात रद्द करण्यात आले होते. मात्र आज, सोमवारी शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community