शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबियांविरोधात CBI चौकशीची मागणी; काय आहे कारण?

145

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी सीबीआयमार्फत कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. यामुळे शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे नागपुरातील RSS च्या रेशीमबाग कार्यालयात, डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन केले वंदन)

लवसा प्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका करणारे मूळ याचिकाकर्ते वकील ॲड. नानासाहेब जाधव यांनी नव्याने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे निकटवर्तीय असणारे अजित गुलाबचंद यांच्या नावाचाही या याचिकेत यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. तर या याचिकेवर नियमितपणे न्यायालयासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील लवसा प्रकल्पाबाबत याचिकाकर्त्यांनी केलेल आरोप काहिसे खरे असले तरीही त्यांनी त्याला आव्हान देण्यास बराच विलंब केला आहे, असे निरीक्षण नोंदवत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने लवासा विरोधातील याचिकेवर निकाल दिला होता. मात्र आता पुन्हा हे प्रकरण समोर आल्याने आता त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. लवासा प्रकरणी पवार कुटुंबीयाच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. यावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.