महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचनेत झालेल्या बदलामुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस पहायला मिळत आहे. प्रभाग रचनेवरुन मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती समोर आली होती. याचमुळे आता महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले असून, 6 ऑक्टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला सगळ्या मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला स्वत: शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ,आरोग्यमंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांसह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
(हेही वाचाः विनायकाच्या मते नारायण ‘अज्ञानी’)
काय आहे प्रभाग रचनेचा वाद?
प्रभाग रचनेवरुन मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती समोर आली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती. हे नेते आपल्या मागणीवर अडून होते.
अजितदादांना मोठा धक्का
दरम्यान, आगामी 18 पालिका निवडणुकींसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वॉर्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकींसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
(हेही वाचाः काँग्रेस ‘आजारी’ आहे, सूज उतरली आहे! सामनातून काँग्रेसला ‘लस’)
Join Our WhatsApp Community