पाहुण्यांची आम्हाला चिंता नाही… आयकर विभागाच्या कारवाईनंतर पवारांचा हल्लाबोल

सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा पिंगा घालत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून अनुभवास येत आहे. भाजपा आपल्या केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी अनेकदा केला.

शनिवारी तर चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे कार्यालय तसेच त्यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. त्यामुळे आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या धडसत्रावर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपण सरकारी पाहुण्यांना घाबरत नसतो, अशी बेधडक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

(हेही वाचाः अजित पवार आयकर अधिका-यांना म्हणतात ‘पाहुणे’! कारवाईवर काय म्हणाले?)

पाहुण्यांची चिंता नाही

अजित पवार यांच्याकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, असं म्हणत त्यांनी आयकर विभागाच्या कारवाईचा समाचार घेतला. इतकंच नाही तर आपल्यालाही कुठलाही संबंध नसताना ईडीची नोटीस आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपाला वेडी ठरवले

ज्या बँकेचं मी कधी पद भूषवलं नाही, ज्या बँकेचा मी कधी साधा सभासदही नव्हतो, त्या बँकेच्या प्रकरणाबाबत मला ईडीची नोटीस पाठवण्यात आली. आता त्यांनी मला ईडीची नोटीस दिली पण संपूर्ण जगाने भाजपाला वेडी ठरवले. अशा शब्दांत त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

(हेही वाचाः अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाड! काय म्हणाले दादा? वाचा…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here