पुतण्याचे बोलणे काकांनी खोडले, काय म्हणाले शरद पवार?

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकामधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आता अलर्ट झाले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपल्या नेत्यांच्या बैठका घेत याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजपचा चेहरा नसल्याचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. अजित पवार यांचा दावा आता थेट शरद पवार यांनीच खोडून काढला आहे.

(हेही वाचाः एकनाथ शिंदेंच्या पाठीशी कोण? शरद पवारांचा रोख कुणाकडे)

काय म्हणाले पवार?

एकनाथ शिंदे यांना गुजरात आणि आसाममध्ये मदत करणारे लोक जे दिसत आहेत ते अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असे मला वाटत नाही पण माझ्या परिचयाचे आहेत. सुरतमधील भाजपचे राज्याचे अध्यक्ष हे आमच्या परिचयाचे आहेत. तसेच आसाममध्ये सर्व बंडखोर आमदारांची व्यवस्था करण्यासाठी तेथील भाजप सरकार पूर्णपणे सक्रीय आहे. त्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याचा अप्रत्यक्ष इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

काका-पुतण्यात विसंवाद

उपमुख्यंमत्री अजित पवार हे पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ आमदारांनी केलेल्या बंडामागे भाजप असल्याचे दिसत नाही, बंडखोर आमदारांची सोय करण्यामध्ये भाजपचा कोणताही मोठा नेता दिसत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य आता शरद पवार यांनी खोडून काढल्यामुळे काका-पुतण्यात विसंवाद असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः काका-पुतण्यात विसंवाद! बोलण्याआधी निदान एकत्र चर्चा करा! मुनगंटीवारांचे शरद पवारांवर टीकास्त्र )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here