शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल! काय आहे नेमके कारण?

The Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar reacts during an event on February 23, 2020 in Mumbai, India. (Photo by Himanshu Bhatt/NurPhoto via Getty Images)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कॅंण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटात दुखत असल्यामुळे रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच तपासानंतर पित्ताशयाचे निदान झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली आहे.

पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कॅंडी येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचे निदान केले आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

शस्त्रक्रिया केली जाणार

दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवार साहेबांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरू होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांच्या ट्वीटला रिट्वीट करत शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here