महाआघाडी सरकार अडचणीत! पुन्हा पवार इन ऍक्शन! मुख्यमंत्र्यांची घेतली भेट!  

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा बरे होऊन सक्रिय झाले आहेत.

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच आलबेल नाही. पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आता खूपच संबंध ताणले आहेत. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनीही तलवार उपसली आहे. उजनीचे पाणी इंदापूरला वळवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सुरु केला आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणावरून मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप त्यांचे नेतृत्व करणार आहे. अशा प्रकारे महा विकास आघाडी सरकार सर्व बाजूने अडचणीत सापडले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. 

तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली आहे. बुधवारी, २६ मे रोजी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. गुरुवारी, २७ मे रोजी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यामध्ये आरक्षण पदोन्नतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे. 

पवारांचे नुकतेच ऑपरेशन झाले. कोरोनाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीतही लोकांच्या समस्या घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे आले. त्यामुळे शरद पवार यांना माझा सॅल्यूटच आहे.
–  एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

या विषयावर झाली चर्चा!

तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना करावयाची मदत, कोरोनाचे संकट, म्युकरमायकोसिसचे संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे काय करायचे? याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडून सल्ला घेतला आहे.

(हेही वाचा : आता भाजपचे मिशन ‘मराठा’! )

पवार पुन्हा सक्रिय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा बरे होऊन सक्रिय झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here