‘त्या’बद्दल फडवणीसांचं कौतुक करायला हवं! काय म्हणाले शरद पवार?

141

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी केला. यासाठी त्यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करून तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केले होते. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी पवारांनी आपलं मत मांडताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

(हेही वाचा – आता एस.टी संपाच्या विरोधात आंदोलन! कोण आणि कुठे करणार?)

काय म्हणाले पवार…

एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शरद पवार म्हणाले. यापुढे ते असेही म्हणाले, सरकार गेल्यामुळे भाजप अस्वस्थ झाले आहे. मात्र, मला त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही. आरोपांच्या खोलात मी अद्याप गेलो नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या एजन्सीज या फडणवीसांच्या विचारांच्या लोकांच्या हातात आहेत. त्यामुळे भाजप या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या 125 तासांच्या रेकॉर्डिंग करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे.

अशा यंत्रणा फक्त भारत सरकारकडे

125 तास रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. 125 तास रेकॉर्डिंग करायचे काम खरं असेल, तर त्यासाठी तशा शक्तीशाली यंत्रणांचा वापर केला असल्याचे दिसून येते. अशा यंत्रणा फक्त भारत सरकारकडे आहे. त्यामुळे राज्यात राज्य सरकारच्या कार्यालयात अनेक तास रेकॉर्डिंग करण्यात यशस्वी झाले. हे खरे आहे का नाही हे सिद्ध झाले पाहिजे असेही शरद पवार यांनी म्हटले.

नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी

भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शरद पवार यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नसल्याचे म्हटले आहे. नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायचे हे घृणास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा व्यवहार करून मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने मलिक यांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.