NCP Crisis : आमदार अपात्रता नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक महिना वेळ द्या, अजित पवार गटाची मागणी

NCP Crisis : 5 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच आमदारांना विधीमंडळाकडून आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला.

174
NCP Crisis : आमदार अपात्रता नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक महिना वेळ द्या, अजित पवार गटाची मागणी
NCP Crisis : आमदार अपात्रता नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक महिना वेळ द्या, अजित पवार गटाची मागणी

विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी (Legislative Council MLA disqualification hearing case) अजित पवार (Ajit Pawar) गटाने अपात्रतेबाबतच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्याचा अधिकचा वेळ मागितला आहे. 5 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Sessions) दुसऱ्या दिवशीच आमदारांना विधीमंडळाकडून आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला.

(हेही वाचा – MIDC : मालकी हक्क नसलेल्या ३४ हेक्टर भूखंडासाठी ‘एमआयडीसी’ने दिले ५ कोटी; ‘कॅग’च्या अहवालात धक्कादायक उघड)

लेखी स्वरूपात देण्याचे आदेश

नोटिसीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषद (Legislative Council) सदस्य नियम 1986 अंतर्गत आपले म्हणणे लेखी स्वरुपात सात दिवसांत देण्याचे उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देश दिले आहेत. आठ दिवसांमध्ये उत्तर न आल्यास आपले याबाबत काहीच म्हणणं नसल्याचे गृहित धरण्यात येईल आणि सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या दाखल केलेल्या याचिकेनंतर या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Defense Minister Rajnath Singh: भारतीय जहाजावर हल्ला करणाऱ्याला शोधून कारवाई करणार- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह)

शरद पवार गटाचे नोटिसीला उत्तर

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या याचिकेवरून रामराजे नाईक निंबाळकर यांना नोटीस काढण्यात आली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून दाखल याचिकेत एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही गटांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांमध्ये आपलं उत्तर सादर करण्याचा आदेश या नोटीसमधून देण्यात आला होता.

शरद पवार (Sharad Pawar) गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रतेबाबत नोटीस देण्यात आली आहे. अजित पवार गटात अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण यांना नोटीस देण्यात आली आहे. या सर्वांनी आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर दिले आहे.

निवडणूक आयोगात सुनावणी सुरू

राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात (Election Commission) भूमिका मांडण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. (NCP Crisis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.