गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आज राष्ट्रवादीच्या दोन गटांची आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांसोबत बैठक झाली. यावेळी अजित पवारांच्या गटातून अनेक बड्या नेत्यांसह स्वतः अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधत आपली बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला? असा थेट सवालही अजित पवार यांनी केला आहे.
(हेही वाचा – राष्ट्रवादीत अजित ‘दादा’; कुणाला किती आमदारांचा पाठिंबा? पहा यादी)
शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. ३ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा होताच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी भावूक झाले. यावरून अनेकांनी शरद पवारांची समजूत काढली. त्यांनी निवृत्त होऊ नये, अशी विनंती होऊ लागली. शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होऊ लागली. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एक समिती स्थापन केली. ही समिती पुढचा अध्यक्ष ठरवेल असं त्यांनी सांगितलं. मात्र कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या हट्टापुढे शरद पवारांना नमतं घेत अध्यक्ष पदाच्या निवृत्तीचा विचार मागे घेतला. या सर्व प्रकारावर आता अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “राजीनामा मागे घ्यायचाच होता तर दिला कशाला असा थेट सवालच अजित पवार यांनी सर्वांसमोर विचारला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community