राज्याच्या राजकारणात मागील दोन वर्षांच्या कालावधीत (NCP Crisis) अभूतपूर्व अशा घटना घडल्या. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारले. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी कोणाची, अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? यांसोबतच आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातही अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता “राष्ट्रवादी आमचीच” असा अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षातील उभ्या फूटीनंतर पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार यांच्या गटाने विधीमंडळात दाखल केली आहे. या याचिकेनंतर या संदर्भात आप-आपले म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली होती. यावर अजित पवार गटाच्या वतीने उत्तर देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Israel-Hamas conflict: इस्रायल-हमास युद्धबंदीचा कालावधी वाढला, ओलिसांच्या चौथ्या देवाणघेवाणीची तयारी)
काय आहे अजित पवार गटाचा दावा ?
अजित पवार गटाने (NCP Crisis) २६० पाणी दिलेल्या उत्तरात म्हंटले आहे की, “आमचा गट हाच मूळ राष्ट्रवादी आहे, कारण पक्षाचे विधानसभेचे प्रतोद अनिल पाटील हे आमच्या बाजूने आहेत. तसेच आमदारांची संख्या देखील आमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी ही आमची आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा,” अशी भूमिका अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर केली आहे.
तर दुसरीकडे शरद पवार (NCP Crisis) गटाने या नोटीसला १० पानी उत्तर दिलं आहे. या नोटिसीला शरद पवार गटाच्या प्रत्येक आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे १० पानी उत्तर सादर केले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community