राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर (Ncp Dispute Case ) अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या चिन्हावर, नावावर दोन्ही पक्षांनी दावा (Ncp Dispute Case ) केला. ज्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? याबाबत दि. १ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होती. मात्र या खटल्याबाबत कोणतीही सुनावणी झालेली नाही. तसेच पुढील सुनावणीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
( हेही वाचा : Congress : पवार आणि ठाकरेंकडे फक्त सहानुभूतीच; उमेदवारीसाठी मात्र इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडेच)
दरम्यान दि. २५ सप्टेंबर रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या वकिलांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीआधी प्रकरण निकाली काढण्याचे आवाहन केले होते. ज्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी दि. १ ऑक्टोबरला करण्याचे निश्चित केले. मात्र ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती मिळते आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट तयार झाले. त्यानंतर पक्षाचे नाव, चिन्ह यावरून दोन्ही गटात संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल देत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) असल्याचे सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचे निरीक्षण नोंदवले.
त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अजित पवारांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल केले. ज्यामुळे शरद पवार गटाने सर्वेाच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाचा निकाल लोकसभेदरम्यान लागला नसल्याने शरद पवारांना तुतारी चिन्हांवर आणि ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ (Sharad Pawar) या नावावर निवडणूक लढवली. दरम्यान या वादाची दि. १ ऑक्टोबरची सुनावणी ही लांबणीवर पडली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community