एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी; विधानपरिषदेत गटनेतेपदी नियुक्ती

156

प्रदेश भाजपातील नेत्यांशी पंगा घेऊन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीने खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदावर निवड केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली.

( हेही वाचा : येत्या दोन महिन्यांत आरोग्य सेविकांची भरती करणार; गिरीश महाजन यांची ग्वाही)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते. शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात भाजपा वाढवण्यात मोठे योगदान असलेल्या एकनाथ खडसे यांनी स्वपक्षातील काही नेत्यांशी पंगा घेत २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेत आमदारकी देऊ केली. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे गटनेतेपदी त्यांची नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.