गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठाण्यात जोरदार पोस्टरबाजीही रंगली पाहिले आहे. अशात आता राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे. भेटीच निमित्त होतं, खासदार श्रीकांत शिंदेंचा वाढदिवस. या भेटीची एक चित्रफीत समाज माध्यमांवर बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसारित केली. तसंच ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है, जहाँ भी ले जाए राहे, हम संग है…’अशा चारोळ्याही लिहिल्या आहेत. या भेटीमुळे आता ठाण्यातील राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चेला अधिक जोर आला आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह राजन किणे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्ताने भेट घेतली. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता नजीब मुल्ला हे आगामी निवडणुकीत काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादीचे २२ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठं खिंडार पडण्याची चिन्ह अधिक दिसून येत आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाकडून आव्हाडांना जशास तसे उत्तर; ‘लबाड बोका ढोंग करतोय’ म्हणतं जोरदार पोस्टरबाजी)
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक रहणमंत जगदाळे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांनीही पक्षप्रवेशाबाबत योग्यवेळी भूमिका जाहीर करू, असं स्पष्ट केलं होत.
Join Our WhatsApp Community