अजित पवारांविरोधात राष्ट्रवादीचेच षडयंत्र! देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट 

103

देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मनमोकळेपणाने बोलत होते, भाषणात अजित पवार यांचे नाव नाही, हे लक्षात आल्यावर पंतप्रधान स्वतः अजित पवार यांना ‘तुम्ही भाषण करा’, असे म्हणत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला. मात्र काही जणांना हे पहावले नाही, त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना भाषण करायला दिले नाही, असे सांगत विरोध सुरु केला, खरेतर हे अजित पवारांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच षडयंत्र आहे, असा आपला कयास आहे. पत्रकारांनी याचा शोध घ्यावा, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत केला.

एमआयएम शिवसेनेची बी टीम 

विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील जे काय बोलले त्यावर आम्हाला काही बोलायचे नाही. कारण एमआयएमने शिवसेनेला मते देऊन शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला आहे. त्यामुळे एमआयएम ही  शिवसेनेची ‘बी’ टीम झाली आहे, आता विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला फायदेशीर ठरेल असे वक्तव्य एमआयएम करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही विधानपरिषद निवडणूक आमचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी लढत आहोत, खडसे किंवा अन्य कुणाला टार्गेट करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही, विधान परिषद निवडणुकीत सगळेच पक्ष योजना आखतात. कुणीही कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ४८ जागांसाठी १८ महिन्यांचे मिशन)

अग्निपथ योजनेविषयी गैरसमजुती 

एनडीएकडे जेवढे मताधिक्क्य आहे, ते पाहता एनडीए राष्ट्रपती पदासाठी जो कुणी उमेदवार देईल, तो सहज निवडून येईल, असेही फडणवीस म्हणाले. अग्निपथ योजनेला गैरसमजुतीतून विरोध होत आहे. अग्निपथ योजना ही सैन्य भरतीतील अतिरिक्त भरती योजना आहे. कायमस्वरूप भरती एका बाजूला सुरूच राहणार आहे. तरुणांमध्ये सैनिकी बाणा निर्माण व्हावा यासाठी ही योजना आहे. आता या योजनेचे स्वागत होऊ लागले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.