‘खरी राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) कुणाची’ यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission of India) सुनावणी सुरू आहे. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले. शरद पवार (Sharad Pawar) गटाने ‘अजित पवारांचा (Ajit Pawar) पक्षविस्तारात कुठलाही हातभार नाही’, असा युक्तीवाद करून अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचा – Ranichi Baug : कोको,स्टेला आणि जेरी, मुंबईतील पेंग्विनच्या तीन पिल्लांचे झाले बारसं)
बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी कारवाईची मागणी
आजच्या सुनावणीत शरद पवार गटाने अजित पवार गटाकडून आयोगात दाखल केलेल्या बोगस प्रतिज्ञापत्राचा मुद्दा उपस्थित केला. ”बोगस प्रतिज्ञापत्र (bogus affidavit) दाखल करणे हा फौजदारी गुन्हा आहे. आयोगाने याची दखल घेत यावर कायदेशीर कारवाई करावी. या मुद्द्यावर आयोगाने आधी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शरद पवार गटाने सातत्याने केली. हा वाद अध्यक्षपदाचा नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे”, असा युक्तीवाद शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आयोगासमोर केला. (NCP Hearing)
पक्ष संघटनेत अजित पवारांवर जबाबदारी नाही
वर्ष २०१९ मध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress) मतदान केले होते. त्यामुळे पक्षाला ५४ जागा मिळाल्या. राज्यात निकालानंतर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना करण्यात आली. अजित पवारांचा कुठलाही हातभार पक्षविस्तारात नाही किंवा त्यांची भूमिकाही नाही. पक्ष संघटनेत अजित पवारांवर कुठलीही जबाबदारी नाही. ते फक्त राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. ही फूट पक्षातंर्गत नाही, तर अजित पवार गटाचा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार गटाने पक्षावर दावा केला, असा आरोप पवार गटाच्या वकिलांनी केला.
(हेही वाचा – Smile : उत्पत्तीस्थळीच डासांचा नायनाट, महापालिकेने खरेदी केल्या सुमारे १९ हजार बायोट्रुप)
राष्ट्रीय अधिवेशनात प्रफुल पटेलच प्रस्तावक
इतकेच नाही तर शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही दिल्लीत पार पडलेल्या पक्षाच्या अधिवेशनात झाली. त्यात निवड करताना प्रस्तावक प्रफुल पटेल होते. आता प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे शरद पवारांच्या निवडीला बेकायदेशीर म्हणत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षपदासाठी केवळ एकच नाव प्रस्तावित होते. त्याच आधारे शरद पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुसरा गट बनवल्यानंतर थेट राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वत:चे नाव घोषित केले. हे चुकीचे आहे, असे आरोप युक्तिवाद शरद पवार गटाने केले आहेत. (NCP Hearing)
अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी २ जुलै रोजी राष्ट्रवादीत फूट पडल्याचा प्रचार करण्यात आला. आजही लोकसभा, राज्यसभेत आमच्याकडे बहुमत आहे, असे शरद पवार गटाने स्पष्ट केले. (NCP Hearing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community