निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आणि चिन्ह अजित पवारांचा (Ajit Pawar) असल्याचा निर्णय आयोगाने दिला आहे. यापूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे गटाचा असल्याचा निर्णय झाला होता. (NCP)
(हेही वाचा – Election Commission of India च्या निकालाने विधानसभा अध्यक्षांचे काम सोपे, अजित पवार गट मजबूत)
पक्ष आणि चिन्ह कोणाचे, हे ठरवण्यासाठी गेल्या ६ महिन्यांत आयोगाने १० सुनावण्या घेतल्या आहेत. आयोगाने १४१ पानांचे निकालपत्र दिले आहे. ज्यात दोन्ही बाजूंनी कोणते पुरावे सादर केले, याची माहिती देण्यात आली आहे. या निकालपत्रात आयोगाने कोणत्या गटाला किती आमदार आणि खासदारांचा पाठिंबा आहे, याची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रासह नागालँड, झारखंड आणि केरळ या राज्यांत आमदार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून १० खासदार आहेत.
कोणाचा पाठिंबा कोणाला ?
- महाराष्ट्र विधानसभेतील ४१ आमदारांनी अजित पवार, तर १५ आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाला पाठिंबा दिला आहे. यातील ५ आमदारांनी दोन्ही गटांना पाठिंबा असल्याचे पत्र आयोगाला दिले आहे.
- लोकसभेतील ४ पैकी २ खासदारांनी अजित पवार आणि ४ खासदारांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. यापैकी एका खासदाराने दोन्ही गटांना पाठिंबा दिला आहे.
- विधानपरिषदेतील ९ पैकी ५ आमदारांनी अजित पवार तर ४ आमदारांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. राज्यसभेतील ४ पैकी १ खासदाराने अजित पवार तर ३ खासदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे.
- पाच आमदार आणि एका खासदाराने दोन्ही गटांला पाठिंबा दिला आहे.
- अजित पवार यांना पक्षाच्या विधिमंडळातील एकूण सदस्य (आमदार आणि खासदार) ८१ पैकी ५१ जणांचा पाठिंबा आहे. शरद पवार यांना २८ जणांचा पाठिंबा असल्याचे आयोगाने निकाल पत्रात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community