जितेंद्र आव्हाडांना विनयभंग प्रकरणात जामीन मंजूर, ठाणे कोर्टाकडून दिलासा

91

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाकडून जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी दुपारी ३ वाजता निर्णय दिला. या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांना मोठा दिला मिळाला आहे.

(हेही वाचा – ‘आयकर’च्या रडारवर अबू आझमी, देशात २० हून अधिक ठिकाणी कारवाई)

जितेंद्र आव्हाड यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकऱणी प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामीन मिळाला असे लहान ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

दरम्यान, कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे पोलिसांना कोणत्याही तपासासाठी सहकार्य करण, बंधनकारक आहे. तर ठाणे कोर्टात सरकारी वकिलांकडून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळू नये, यासाठी युक्तीवाद केला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्याप्रकरणी त्यांच्यासाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. पण त्याचेही आव्हाडांकडून पालन करण्यात आले नाही, असा मु्द्दा सरकारी वकिलांनी कोर्टात मांडला. आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांनी देखील विरोध केला. पण आव्हाडांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादामुळे त्यांना मंगळवारी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने हा युक्तीवाद केला. यांनी सगळे मुद्दे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही व्हिडिओ देखील कोर्टात सादर केले. आव्हाडांनी जाणीवपूर्वक महिलेला धक्का दिला नाही, असे आव्हाडांच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले. संबंधित तक्रारदार महिलेला जितेंद्र आव्हाड बहिण मानतात, मग ते त्या महिलेचा विनयभंग कसा करतील, असा सवालही वकिलांनी कोर्टात उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.