मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील जेवणाचे २.३८ कोटी बिल; चहात सोन्याचे पाणी घालता का?; अजित पवारांचा खोचक सवाल

174
मागील चार महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये इतके आले आहे. एवढे बील कसे काय आले? सरकार चहामध्ये सोन्याचे पाणी टाकायचे का? असा खोचक सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपावर टीका केली. सरकारकडून जाहिरातबाजीवर वारेमाप खर्च केला जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या निधीचे वितरण झालेले नाही. आर्थिक वर्ष संपत आले. त्यामुळे हा निधी परत जणार आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाही. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

आमदार, मंत्र्यांच्या मतदारसंघांत कोट्यवधींची कामे

ग्रामीण भागातील विकासासाठी दिला जाणारा निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे खर्चाअभावी हा निधी परत जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मात्र तिजोरीचा विचार न करता, केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदाररसंघात कोट्यवधींची कामे जाहीर करण्यात आली. मात्र तेवढा निधी सरकारकडे नाही. ही लोकांची फसवणूक आहे, अशी टीका अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.