अजित पवारांनी शरद पवारांसमोर मनातलं दुःख केलं व्यक्त: म्हणाले, एकट्याच्या बळावर…

224
अजित पवारांनी शरद पवारांसमोर मनातलं दुःख केलं व्यक्त: म्हणाले, एकट्याच्या बळावर...
अजित पवारांनी शरद पवारांसमोर मनातलं दुःख केलं व्यक्त: म्हणाले, एकट्याच्या बळावर...

‘मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीकडे वळून पाहताना मला कधी कधी अतिशय दु:खं होतं. ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम बंगाल जिंकू शकतात. अरविंद केजरीवाल दोन-दोन राज्यात सत्ता स्थापन करू शकतात. नितीश कुमार बिहारमध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण करू शकतात. इकडे आंध्रात गेलात तर चंद्राबाबू नायडू किंवा जगनमोहन रेड्डी सत्ता आणू शकतात. किंवा आता तेलंगणात गेलात तर केसीआर म्हणजे बीआरएच पक्ष एकट्याच्या ताकदीवर सरकार स्थापन करून शकतात. पण या सगळ्यांमध्ये सर्वात उजवे तर शरद पवार आहेत की नाही? हो.. तुम्ही शिट्ट्या मारताय, टाळ्या वाजवताय, पण कधी महाराष्ट्रात आपण एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी पक्ष सत्तेत निवडून आणू शकलो का? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत मनातील दुःख बोलून दाखवलं.

(हेही वाचा – International Yoga Day 2023: भाजपा महिला मोर्चातर्फे नऊवारीमध्ये योग प्रात्यक्षिके)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. पुढे अजित पवार म्हणाले की, आपली राष्ट्रीय मान्यता गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. २५ वर्षांच्या काळात मागे वळून पाहिलं तर कितीकाळ सत्ता होती, किती काळ नव्हतो. अनेक नव्या सहकार्यांना आपलंसं केलं. त्यात खडसे, मुंडे आले. पण संघटनेत कोण कधी आलं याला महत्व नाही. तर पक्ष तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल तो पक्षाचा जीवाभावाचा आपला सहकारी आहे. ज्याच्याकडे नेतृत्व, कर्तृत्व, संघटन कौशल्य आहे त्याला पक्षात नक्कीच संधी आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.