छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या आदल्या दिवशी मुसलमानांनी दंगल घडवली. त्यानंतर या दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात आहे, असा आरोप करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी खुलासा केला. केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याचा तपास करा, ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊन जाऊद्या असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. हे खासदार अनिल बोंडेंना सांगा असेही अजित पवार म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना अजित पवार संतापले. चौकशी करण्याचे काम हे पोलिस यंत्रणेचे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याबाबत वेगवेगळ्या पक्षाची नावे घेण्यापेक्षा याची चौकशी करावी. कोणी घडवले? का घडवले? याची चौकशी करावी, असे अजित पवार म्हणाले. त्यामागचा सुत्रधार कोण आहे त्याच्यावर कडक शासन झाले पाहिजे. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, असेही अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे)
Join Our WhatsApp Community