पुण्याचे भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्याविरुद्ध त्यांनी खडक पोलीस स्थानकात लेखी तक्रार देखील नोंदवली. या सर्व प्रकारावर विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले अजित पवार?
माझ्याकडून नक्कीच धोका असू शकतो, पण तो जिवाला नाही तर राजकारणात असू शकतो, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणालाही कोणाकडूनही जीवाला धोका वाटत असेल तर त्यांना पोलिसांकडून, सरकारकडून संरक्षण मिळायला हवं. मला तुम्ही अनेक वर्षे ओळखत आहात, मी कायदा आणि सुव्यवस्था, तसेच संविधान पाळणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडून कोणाच्या जिवाला धोका असण्याचे काहीच कारण नाही, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेत्याची पुणे पोलिसात तक्रार)
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यासमोरील एका मोकळ्या प्लॉटची मोजणी करू नये असे न्यायालयाकडून आदेश देण्यात आले होते. मात्र तरीदेखील या प्लॉटची मोजणी अविरतपणे चालूच होती. या मोकळ्या प्लॉटचा ताबा रवींद्र साळगावकर यांच्याकडे असल्यामुळे त्यांना सतत धमकी मिळत होती. त्याविरुद्ध त्यांनी काही दिवसांपूर्वी पुणे शहर तहसील कार्यालयात देखील तक्रार नोंदवली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर खडक पोलीस स्थानकात या प्रकाराची लेखी तक्रार नोंदवली. या सगळ्या प्रकारावर अजित पवार कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
Join Our WhatsApp Community