काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांनी वाढदिवसाच्या दिवशी नाराजाचे पत्र देण्याबरोबर राजीनाम्याचे पत्र दिले होते. पण आता थोरातांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहेत. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतीच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘ज्यावेळेस मी त्यांना वाढदिवसानिमित्ताने फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, बाळासाहेब तुमचा आज वाढदिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दिर्घाष्यु लाभावे. तुम्हाला शुभेच्छा. पण एक अशी बातमी आहे, ज्याबद्दल तुम्हाला विचारव की नाही हे कळत नाहीये. आज तुम्ही गडबडीत असाल. पण ते म्हणाले की, दादा , मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षा अंतर्गातला प्रश्न आहे. मी माझ्या पक्षातील वरिष्ठांशी बोलून त्याबद्दल पुढील सर्व काही ठरवणार आहे.’
पण आता कॉंग्रेस हायकमांड बाळासाहेब थोरातांची मनधरणी करत असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय काँग्रेस येत्या निवडणूका आणि विधीमंडळाचे अधिवेशन याचा विचार करून बाळासाहेब थोरात यांच्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – थोरातांना भाजपात प्रवेश देणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…)
Join Our WhatsApp Community