नॉट रिचेबलच्या वृत्तावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

140

माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांणा सध्या उधाण आलं आहे. यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी देखील “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं लिहित पहाटेच्या शपथविधीचा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या फोटसहित एक सूचक ट्वीट केलं. ज्यामुळे अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आलं. पण आता नॉट रिचेबलच्या वृत्तावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत माध्यमांनी विनाकारण बदानामी करणं थांबवावं, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात, असा सल्ला दिला.

शनिवारी सकाळी अजित पवार यांनी पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या शोरुमचं उद्घाटन केलं. यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी नॉट रिचेबलच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, ‘शुक्रवारी मी कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. माझी जागरण जास्त झाली, दौरे जास्त झाले की, मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही, पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे मला कसतरी व्हायला लागल्यामुळे डॉक्टरकडून गोळ्या घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवास्थानी जाऊन शांतपणे झोपलो. आणि सकाळापासून कार्यक्रमाला सुरुवात केली.’

पुढे अजित पवार म्हणाले की, ‘मला इतकं वाईट वाटतं, जेव्हा माध्यम अजित पवार नॉट रिचेबल, अमूक तमूक दाखवतं होत. हे बंद कराना. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. त्यामुळे विनाकारण बदानामी करणं थांबवावं, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात.’

(हेही वाचा – “विरोधकांनी हिंडनबर्गला जास्त महत्त्व दिले”, अदानी प्रकरणी काय म्हणाले पवार?; कॉंग्रेसलाही फटकारले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.