Ajit pawar vs Rohit pawar : काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

159
Ajit pawar vs Rohit pawar : काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला
Ajit pawar vs Rohit pawar : काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत, अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करत राजकीय खळबळ उडवून दिली.तसंच आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवार गटाच्या इतर नेत्यांवरही हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी आपला पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रथमच टीका केली आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत असल्याचे पवार म्हणाले. (Ajit pawar vs Rohit pawar)

काय म्हणाले अजित पवार
पुण्यावरून निघालेली रोहित पवारांची (Rohit Pawar) युवा संघर्ष यात्रा येत्या १२ डिसेंबरला नागपूरला धडकणार आहे. या यात्रेवरून नाव न घेता रोहित पवारांवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, “काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?” असा खोचक सवाल करत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. तसंच यावेळी जितेंद्र आव्हाडांनाही त्यांनी डिवचलं. “मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसं आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला, अरे कशासाठी? त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिलो, कारण आपल्यात तशी हिंमत आहे,” असं अजित पवार म्हणाले. (Ajit pawar vs Rohit pawar)

(हेही वाचा : Ajit Pawar vs Sharad Pawar : राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”अजित पवारांचा खळबळजनक आरोप)

पक्षवाढीसाठी जास्त काम करावं लागणार
आगामी निवडणुकांबद्दल भाष्य करताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, यापुढे मी आठवड्याच्या सात दिवसांपैकी तीन दिवस मुंबईला, एक दिवस पुण्याला आणि उर्वरित तीन दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहे. पक्षवाढीसाठी मलाही जास्त काम करावं लागणार आहे. असं काम प्रदेशाध्यक्षांना करावं लागेल, सगळ्या सेलच्या प्रमुखांना करावं लागेल आणि आपल्या मंत्र्यांनाही करावं लागेल. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवाव्या लागतील. Ajit pawar vs Rohit pawar

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.