राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देऊनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात वाॅरंट जारी करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांनी शिरगाव येथे रस्त्यावरच ठिय्या केला. मुंबई पोलीस अधिनियमानुसार, जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात आमदार जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, विलासराव शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
( हेही वाचा: नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी पुलकुंडवार, रमेश पवारांना परतावे लागणार स्वगृही )
म्हणून वाॅरंट जारी करण्यात आला
या प्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देऊनही न्यायालयात हजर न राहिल्याने, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात वाॅरंट काढले होते. शुक्रवारी दुपारी जयंत पाटील हे इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले होते. जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वाॅरंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे.
Join Our WhatsApp Community