डी कंपनी विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू असून त्यांचा या संदर्भात जबाब नोंदवून घेतला जात आहे. बुधवारी सकाळीच ईडीने नवाब मलिक यांच्या घरी जाऊन समन्स देत चौकशीसाठी ताब्यात घेऊन ८ वाजता ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच १९९३ च्या स्फोटातील आरोपीकडून जामीन केल्याच्या आरोपामुळे ही चौकशी केली जात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik arrives at the office of the Enforcement Directorate in Mumbai. Details awaited.
(File photo) pic.twitter.com/vYMmvovKsQ
— ANI (@ANI) February 23, 2022
मलिकांच्या घरी ईडीची धडक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने डी कंपनी विरोधात दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संबधित असणाऱ्या व्यक्तींच्या घरी, कार्याल्यावर धडक दिली. या टाकण्यात आलेल्या छापेमारीत हवाला प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे गोळा करण्यात आले होते. गोळा करण्यात आलेल्या पुराव्यामध्ये मलिक यांचे नाव आल्यामुळे ईडीने बुधवारी सकाळीच मलिक यांच्या कुर्ल्यातील घरी जाऊन समन्स देत चौकशीसाठी ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू
मुंबईतील नागपाडा आणि भेंडी बाजार परिसरात खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, रिअल इस्टेटच्या विक्रीतून बेकायदेशीरपणे मिळवलेल्या पैशांशी संबंधित अनेक हवाला व्यवहार आढळून आल्यानंतर ईडीकडून दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, छोटा शकील, पारकर आणि जावेद चिकना यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याला अटक करण्यात आलेळू असून हसीना पारकर हिच्या मुलाकडे देखील ईडीने नुकतीच चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला आहे.
(हेही वाचा – समीर वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा विरोध)
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासह केला होता, कदाचित या जमीन खरेदी संदर्भात ईडीकडून मलिक यांची चौकशी करण्यात येत असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.