जगभरात महिला दिन साजरा होत असताना मंत्रिमंडळात एकही महिला नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

133

राज्य विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू असून बुधवारपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना एक खंतही बोलून दाखवली. पवार म्हणाले की, जगभरात महिला दिन साजरा होत असताना मंत्रिमंडळात एकही महिला नाही याची खंत वाटते.

आज देशभरासह जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका करताना महिला मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका गोष्टीची खंत वाटते की एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रीमंडळात एकही महिला नसणे हे कमीपणाचे वाटते. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: ‘कानून के हात लंबे होते है’ म्हणत, वसंत मोरेंनी केली फेसबूक पोस्ट )

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात मांडणार

अजित पवार यांनी अवकाळी पावसाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. शेतक-यांचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे. हवामान खात्याने 6 ते 9 मार्च असा हवामान बदलाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अजूनही दोन दिवस नुकसान होऊ शकते. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.