देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण भाजपमुळे खड्डयात गेले; भुजबळांचा घणाघात

166

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणही रद्द केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आरक्षण न मिळण्याचे खापर भाजपवर फोडले आहे. भुजबळ म्हणाले की, संपूर्ण देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. भाजप शासित राज्यानेही ट्रिपल टेस्ट केलेली नाही. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपने न्यायालयात जाऊन हा खेळ केला. हा देशाला महागात पडला आहे. आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले असल्याचा घणाघात छगन भुजबळ यांनी केला आहे.

…तर आज ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आम्ही इम्पिरिकल डेटा मागत होतो. तो दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते. अॅड. तुषार मेहता हे साॅलिसिटर जनरल मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडत होते. भाजपने डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे त्यात अडचण झाली असे भुजबळ म्हणाले. भाजपचे लोक सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राविरोधात गेले. आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी आरक्षण खड्ड्यात गेले असून हे केंद्र सरकारचे पाप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: रुपयाचा ऐतिहासिक नीचांक )

हा आरक्षण संपवण्याचा डाव

आम्हाला विचारतात तुम्ही काय केले, आता भाजपने काय केले असे विचारणार का असा सवाल ही त्यांनी केला. आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना सांगतो दिल्लीत जाऊन बसा आणि मार्ग काढा असा टोलाही भुजबळांनी विरोधकांना लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.