राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतेच देवी सरस्वतीचा अवमानकारक उल्लेख केला. त्यामुळे भुजबळांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. भुजबळांचा हा हिंदुद्वेष समोर आल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये भुजबळ पर्यायाने राष्ट्रवादीवर चौफेर टीका होऊ लागली. त्यानंतर भुजबळ यांना चक्क उपरती आली आणि त्यांनी शनिवारी, १ ऑक्टोबर रोजी चक्क कालिका देवीच्या चरणी येऊन तिचे दर्शन घेतले. त्यावेळी बाजूला असलेल्या देवी सरस्वतीचीही त्यांनी आरती करून तिचे दर्शन घेतले.
हिंदुद्वेषी शिक्का बसू नये यासाठी खटाटोप
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशा वेळी हिंदुद्वेषी शिक्का बसू नये म्हणून भुजबळ थेट नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांनी आरती सुद्धा केली. पण याच कालिका देवीच्या मंदिरात तीन देवीच्या मूर्ती आहे. त्यात मध्यभागी कालिका असून एका बाजूला सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी कालिका देवीच्या दर्शनाबरोबर केलेल्या आरतीत सरस्वती देवी आणि महालक्ष्मीची आरती देखील केली आहे. भुजबळ यांनी नुकतेच सरस्वतीला पाहिले नाही तिची पूजा कशाला करायची असे म्हणत शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो लावले पाहिजे असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ते अडचणीत आले.
(हेही वाचा मनोहर जोशींना हटवून उद्धव ठाकरेंना १९९५लाच व्हायचे होते मुख्यमंत्री, सुरेश नवलेंचा गौप्यस्फोट )
Join Our WhatsApp Community