राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या त्यांच्या नाशिक येथील निवास्थानी विश्रांती घेत आहेत.
छगन भुजबळ सोमवारी येवला दौऱ्यावर होते. यावेळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नाशिकमधील आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना काही वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले होते. यामध्ये कोरोना चाचणीचाही समावेश होता. दरम्यान, मंगळवारी कोरोना चाचणीचा अहवाल आला असून त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे छगन भुजबळ यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही विषाणूची लागण झाली होती. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णवाढीचा दर सुमारे ३ टक्के इतका आहे. एच१एन१, एच३एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
(हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका; दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द)
Join Our WhatsApp Community