राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना, ट्वीट करून म्हणाले…

84

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शरद पवार

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ट्वीट करून शरद पवार यांनी त्यांना कोरोना झाल्याचे म्हटले आहे.

पवारांनी केले जनतेला आवाहन

गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी जनतेला आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त 25 जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना झाल्यानं ते अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा –उर्दू लर्निंग सेंटरचे पहिले विद्यार्थी ठरणार आदित्य ठाकरे: समाजवादी पक्षानं उर्दूतून पाठवलं पत्र!)

पवार साहेब, आराम करा

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब, आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.