देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी; जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

149

गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते गौप्यस्फोट करणारी आणि खळबळ उडवणारी वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला गेल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची राजकीय खेळी असल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्यात त्यावेळी (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या अनुषंगानं केलेली ही खेळी असू शकते. त्यावेळी अजित पवारांनी जी विधान केली, त्याला आजही महत्त्व आहे. त्यानंतर अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री होऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं. स्पष्टपणाने कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार गेले. त्यामुळे सरकार कोसळलं. राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली. हे आपल्याला नाकारता येणार नाही.’

२३ नोव्हेंबर २०१९ सालच्या पहाटे अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली. देशभरात या शपथविधी सोहळ्याची चर्चा झाली. पण हे सरकार साडे तीन दिवसांत कोसळलं होत. या शपथविधीची कुणकुण कोणत्याही माध्यमांना आणि राजकीय पुढाकाऱ्यांनाही लागू दिली नव्हती.

(हेही वाचा – By Election 2023: कसबा पेठेसह चिंचवडमधून भाजपकडून कोणता उमेदवार लढणार? सांगितलं चंद्रकांत पाटलांनी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.