राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, रेल्वे खाली उडी मारून वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्ये मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
महाविकास आघाडीच्या काळात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे वैभव कदम काही काळासाठी अंगरक्षक होते. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात आरोपी म्हणून वैभव कदम यांचे नाव होते. त्यामुळे याप्रकरणात त्यांची सतत चौकशी सुरू होती. दरम्यान वैभव कदम यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर एक शेवटचा स्टेटस टाकल्याची माहिती भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिली आहे. या स्टेटसमध्ये पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे मी आरोपी नाही असे लिहिण्यात आले आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1640981603467014144
नेमकी घटना?
घोडबंदर येथील कावेसर भागात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना पकडून आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्यावेळी आव्हाड तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. यामध्ये वैभव कदम यांचेही नाव होते. पण त्यांची लगेचच जामिनावर सुटका झाली होती. पण करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणीही करण्यात आली होती.
(हेही वाचा – …तर ठाकरे किंवा संजय राऊतांनी, राहुल गांधींच्या फोटोला चप्पलने मारून दाखवावे; बावनकुळेंचे आव्हान)
Join Our WhatsApp Community