राष्ट्रवादीचे पंतप्रधानांना पत्र! काय केली मागणी?

123

रशिया-युक्रेन युद्ध वाढले आहे. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. डिझेलच्या दरात तब्बल २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील राज्य सरकारे आणि महापालिका परिवहन बसेसनाही याचा फटका बसणार आहे. म्हणून या भाववाढीचा भार सर्वसामान्यांवर पडण्याची शक्यता आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. त्यामध्ये सरकारी बसेस आणि महापालिका बसेस यांना डिझेल दरवाढीतून सूट देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आले आहे.

मुंबईत डिझेल १२२ रुपये प्रति लीटर

रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सरकारी आणि महानगरपालिका परिवहन सेवांवर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईत तर डिझेलचे दर १२२ रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या परिवहन सेवांचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिझेलचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या दरावर परिणाम होईल. त्यामुळे त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

(हेही वाचा ‘तो’ पक्षाचा निर्णय नाही-शरद पवार)

पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा आणखी वाढला

तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल पंपावरील विक्री सलग पाचव्या महिन्यात वाढली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा आणखी वाढला आहे. या तोट्याचा सामना करण्यासाठी कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत. इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा सर्वात मोठा फटका नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी वितरकांना बसला आहे. तोट्यामुळे पंप बंद करण्याची कंपन्यावर आली आहे. तोट्यामुळे रिलायन्सने आपल्या विक्रेत्यांना डिझेलच्या पुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यास सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.