संविधान बदलणार हे Narrative असल्याची जयंत पाटलांची कबुली!

216
संविधान बदलणार हे Narrative असल्याची जयंत पाटलांची कबुली!
  • खास प्रतिनिधी 

भाजपा संविधान बदलणार हे एक नरेटीव्ह (Narrative) असल्याची कबुलीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा सभागृहात दिली.

सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड केली. त्यानंतर नार्वेकर यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्याला पाठिंबा देताना जयंत पाटील बोलत होते.

महायुतीला कौल

राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेवर आल्यास संविधान बदलणार असे फेक नरेटीव्ह पसरवले आणि त्याचा फटका भाजपाला बसला. विधानसभा निवडणुकीतही तेच नरेटीव्ह (Narrative) सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र जनतेने या निवडणुकीत महाविकास आघाडीवर विश्वास न ठेवता महायुतीला कौल दिला.

(हेही वाचा – Assembly Session : आमदारांच्या बोलण्यावर चाप लावावा!)

बेरोजगारी, महिला अत्याचार, संविधान चालले नाही

जयंत पाटील यांनी विधानसभेत भाषण करताना स्पष्टच सांगितले की त्यांचा संविधानावर जास्त जोर नव्हता.

जयंत पाटील म्हणाले, “आमचं काही तुम्हाला (महायुती) चैलेंज नाही. तुम्ही २३७ वर (बहुमत: २३२ अधिक ५ अपक्ष) आलेला आहात. तुम्हाला विरोध करत करत आम्ही महागाईवर भाषणे केली बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, संविधानावर जास्त जोर नव्हता माझा. जे जे मुद्दे आम्ही जनतेपुढे मांडले त्यावर जनतेने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता चांगले सरकार तुम्ही चालवाल, अशी अपेक्षा आहे,” असे पाटील म्हणाले.

फडणवीस जात ताकदीने आले

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) पाटील पुढे म्हणाले की, “फडणवीस म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’ आणि पाच वर्षांनी आले. फडणवीस यांनी विरोधी पक्षाशी संवाद साधण्याचा आता प्रयत्न केला, त्याचे आपण स्वागत करतो,” असे पाटील म्हणाले. पाटील पुढे म्हणाले, “फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. आणि आज ते जास्त ताकदीने सभागृहात येऊन बसले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो.” (Narrative)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.