राष्ट्रवादीसाठी शिवसेना ‘हा’ त्याग करेल का?

95

आगामी निवडणुकांध्ये शिवसेनेने मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली. यासाठी त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली. या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

राज्यात काही वेळा मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचेही नेते मंडळी निवडणुकीची तयारी करा, असे सांगत आहेत, तर शिवसेनेही राज्यभर शिवसंपर्क मोहिमेच्या अंतर्गत संपर्क सुरू केले आहेत. त्यामुळे आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या एका फेसबूक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. आगामी निवडणुकांमुळे आताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खरेतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळीच मागणी केली आहे.

(हेही वाचा आता ‘आप’चे लक्ष्य नऊ राज्ये!)

नितीन देशमुखांनी काय म्हटले?

नितीन देशमुख यांनी लिहिले की, ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहत आहे, त्याप्रमाणे पार्थ यांनाही एक फेअर चान्स मिळाला पाहिजे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.