राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कादिर मौलाना यांनी ‘आम्ही औरंगजेबाला आदर्श मानतो’, असे विधान केले आहे. शहरातील सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित बीआरएस पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. सोमवारी झालेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना कादिर मौलाना म्हणाले, औरंगजेब चांगला राजा होता. औरंगजेब राजा होता तेव्हा त्याने अनेक मंदिरांसाठी जागा उपलब्ध करून दिली. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तुम्हाला काही इतिहास माहीत नाही. औरंगजेबने कधीच जातीवाद केला नाही. गंगा औरंगजेबाच्या राज्यात होती. तेव्हाही सत्तासंघर्ष होता आणि आजही चालू आहे. औरंगजेब असा राजा होता ज्याने अखंड भारतावर ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. म्हणून मी औरंगजेब मानतो. एक आदर्श म्हणून त्यांनी भारतावर राज्य केले, अर्थातच ते एक आदर्श आहेत”.
एकीकडे औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलेले असताना दुसरीकडे कादिर मौलाना यांनी औरंगजेबला आदर्श मानत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर बीआरएस पक्षावरही टीका होण्याची शक्यता आहे. कादिर मौलाना यांच्या या वक्तव्यामुळे बीआरएस पक्षातील अनेकजण नाराज असल्याचेही बोलले जात आहे.
(हेही वाचा Hindu : धर्मांध मुसलमानांचा फ्रान्ससह युरोपात धार्मिक उन्माद; तर अमेरिकेत हिंदूंचे गीता पठण )
Join Our WhatsApp Community