राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकरांची गुगली; गडकरी, राणेंचे कौतुक करीत दिले वेगळेच संकेत

234
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा २०१४ पासून सुरू आहे. अशात त्यांनी एका मुलाखतीत भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नारायण राणे यांचे तोंडभरून कौतुक केल्याने या चर्चांना खतपाणी मिळाले आहे.
विरोधीपक्ष नेते म्हणून विधानसभेत नारायण राणे, तर विधानपरिषदेत नितीन गडकरी यांचे काम मला भावले. ज्या पद्धतीने हे दोघे प्रश्न उपस्थित करायचे, त्याला उत्तर देताना मंत्र्यांच्या पोटात धडकी भरायची, अशी स्तुतीसुमने रामराजे निंबाळकर यांनी उधळली. सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरोधीपक्ष नेत्याची भूमिका पार पाडत असताना, त्यांचे नाव टाळत निंबाळकरांनी थेट भाजपाच्या नेत्यांची नावे घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सभापती पदावर निशाणा?

रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची टर्म संपल्यापासून विधानपरिषदेत सभापती पद रिक्त आहे. भाजपाकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे अशी नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत. मात्र, संख्याबळ नसल्याने योग्य वेळेची वाट शिंदे-फडणवीस पाहत आहेत. अशावेळी भाजपाच्या नेत्यांचे कौतुक करून रामराजे निंबाळकर कोणत्या संकेतांकडे अंगुलीनिर्देश करू इच्छितात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.