भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. नियमानुसार सहा महिन्यात इथे पोट निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे आतापासूनच या पोटनिवडणुसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील या कसबातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार. मुक्ताताई टिळक यांच्यानंतर त्यांचा घरातून राजकारणात येण्यासाठी आणि पोटनिवडणूक लढवण्यासाठी कोणी नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगाही लहान असून त्याचे नुकतेच लग्न झाले आहे, असेच रुपाली पाटील म्हणाल्या. मात्र त्यानंतर लागलीच त्यांची राजकीय उंची मोजून दाखवणारी विधाने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली. त्यामुळे रुपाली पाटील यांचा मार्ग सोपा नाही, हे आताच दिसून आले आहे.
काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्हयुज असणाऱ्या कार्यकर्ते आहेत, त्याचे मतात रूपांतर होऊ शकत नाही. मध्यंतरी मनसेने पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा अत्यंत लाजिरवाणी मते त्यांना पडली होती. त्या वेळेलाही सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्हयुज होत्या, परंतु मतांचा दहा हजाराचा टप्पासुद्धा पाच जिल्ह्यातून पार करता आला नव्हता.कसबा मतदारसंघात सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो. लढायची इच्छा कोणीही व्यक्त करू शकते, त्याबद्दल दुमत नाही, परंतु ‘वारंवार दादागिरी करणारा आणि तोंडात सततची शिवराळ भाषा’ असणारा कार्यकर्ता/ कार्यकर्ती कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार म्हणून देईल, असे वाटत नाही, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
(हेही वाचा आता छत्तीसगडमध्ये LOVE JIHAD; शाहबादने कुसुमच्या शरीराची केली चाळण )
Join Our WhatsApp Community