स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘मविआ’ एकत्र लढणार! काय म्हणाले पवार?

सध्या राजकीय वर्तुळात फक्त अयोध्या दौऱ्याची चर्चा आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा काही राजकीय मुद्दा नाही. माझा नातू देखील अयोध्येत जाऊन आला, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांना आगामी निवडका, भीमा कोरेगाव, वाढती महागाई आणि राणा दामप्त्यांसह अनेक विषयावर आपले मत व्यक्त केली. राज्यात सध्या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने हे सरकार स्थापन झाल्यामुळे राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढणार का असा सवाल उपस्थित होत आहे. यासंर्भात संभ्रम असताना शरद पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना न्यायालयाच्या निकालाबाबत गैरसमज झाला असल्याचे शरद पवारांनी बोलून दाखवले. 15 दिवसांत निवडणुका घ्या, असे न्यायालयाने सांगितलेले नाही, तर 15 दिवसांत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करा, असे न्यायालयाने सांगितले आहे, असे मला वाटते. मतदान प्रक्रियेला किमान 2 ते अडिच महिने लागतील.

(हेही वाचा – नागपुरात खळबळ, रेल्वे स्थानकाजवळ बॉम्ब सदृश आढळल्या वस्तू)

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ओबीसी मेळाव्यात भाजपकडून 27 टक्के ओबीसींना तिकीटं देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर शरद पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ओबीसी आरक्षण असलेल्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देणार असल्याचे म्हटले. मात्र निवडणुका एकत्र लढाव्या की वेगवेगळ्या याबद्दल माझ्या पक्षात दोन मतं असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केले.  स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या, असे काही जणांचे मत आहे. तर काही जणांनी स्वतंत्र लढावे आणि नंतर एकत्र यावे, असे काही जण म्हणतात. याबाबत महाविकास आघाडीमध्ये याबाबत पूर्ण चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here