अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अजूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता खुद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिला आहे.
पुण्यात आयोजित ‘बॅंकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषद’ या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आता मला फडणवीसांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही.
सत्तासंघर्षाबाबत शरद पवार म्हणाले…
तसंच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत काय होणार? हे सांगणं कठीण आहे.
पोटनिवडणुकीसाठी स्वतः मैदानात उतरले शरद पवार
दरम्यान कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारही मैदानात उतरले आहेत. येत्या २२ फेब्रुवारीला कसबा पोटनिवडणुकीसाठी संध्याकाळी ४ ते ९ पवारांची भव्य सभा होणार आहे. तर त्या दिवशी सकाळी ११ वाजता चिंचवड विभानसभा पोटनिवडणुकीसाठी सभा घेणार आहेत.
(हेही वाचा – राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण मुंबई महापालिकेत वजन मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपचेच)
Join Our WhatsApp Community