निवडणूक आयोगाकडूनन शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले, त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले. अशातच आरोप-प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे गटावर टीका केली आहे. तर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यावर सुप्रिया सुळेंची शायराना अंदाजात प्रतिक्रियाही दिली आहे. हे सगळं चित्र पाहता मला एक गाणं आठवतं “हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके”, असे त्या म्हणाल्या. अशी घटना अगोदरही झाली आहे. पण मला शिंदे गटाची काळजी वाटते. त्यासाठीच मला हे गाणं आठवतं अशा शब्दात सुळेंनी शिंदे गटावर टीका केली आहे.
(हेही वाचा – शरद पवारांसह रावसाहेब दानवेंचा एकाच गाडीतून एकत्र प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चा)
पुढे बोलतना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपण दोन गोष्टी बघू शकतो, एक म्हणजे शिवसेनेवर हा अन्याय झाला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंविरोधात हे सर्व कटकारस्थान करण्यात आले आहे. चिन्ह गोठवण्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या अशा गोष्टींनी पक्ष संपत नसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पण २०१९ ला संपली असे म्हणत होते. पण असे पक्ष संपत नसतात. देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे बोलतात ते सगळेच खरे नसते. पक्ष बदलल्यावर असे बोलले जाते. राष्ट्रवादीवर आरोप केले जातात. उपमुख्यमंत्र्यांना विचारा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाहीत, या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, माझ्यावर संस्कार झाले आहे. त्यामध्ये आई-वडिल हे आदर स्थानी आहेत त्यांनी असे शिकवले नाही. अतिथी देवो भव, आमचा एक पक्ष एक विचार असे नाही. आम्ही संविधानानुसार चालतो, असेही त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community