राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडीत वाद; प्रकाश आंबेडकरांना सुनावले

132

वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी युती केली, त्याआधी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास हरकत नाही. परंतु त्याची जबाबदारी ठाकरे गटाने घ्यावी, असे सांगत निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाने त्यांच्या वाट्यातील जागा वंचितला द्याव्यात, असे सुचवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत ‘जर सामंजस्यपणा नसेल तर एकत्र राहण्याचे नाटक का करायचे, असे म्हटले. तरीही हा वाद संपला नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांना सुनावले.

काय म्हणाल्या विद्या चव्हाण? 

पवार साहेब काय आहेत? हे अवघ्या देशाने पाहिलेले आहे. ज्यावेळी प्रकाश आंबडेकर यांनी भाजपाची बी टीम असलेल्या एमआयएमसोबत हातमिळवणी केली होती. त्यांच्यासोबतही आंबेडकरांचे पटले नाही. त्यांचे कुणासोबतच पटू शकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबडेकर यांनी लवकरच शुद्धीवर यावे. शरद पवार भाजपाचे असते तर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन त्यांनी भाजपाला रोखले नसते. ‘५० खोके, एकदम ओके’ करुन आणि सूरत तसेच गुवाहटीच्या कामाख्या देवीला आमदारांना नेऊन मविआ सरकार पाडण्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणून पवार भाजपाचे होते नाहीत. आंबेडकरांच्या शब्दावर देश चालत नाही. पवारांची उंची काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पवारांनी सत्तेचा विचार केला नाही. सत्तेसाठी काम करणारे पवार नाहीत. प्रकाश आंबडेकर यांनी शुद्धीवर येऊन बोलले तर बरे होईल, अशी खरमरीत टीका विद्या चव्हाण यांनी केली.

(हेही वाचा इस्रोचा पराक्रम; यान कधीही बनणार क्षेपणास्त्र)

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.