राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारे अंतर्गत वाद आता विकोपाला गेले असल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे कायमंच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. याच मिटकरींनी आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या विरोधात सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच मोहोड यांना हजर राहण्याचे निर्देश सायबर सेलने दिले असल्याची माहिती मिळत आहे.
मिटकरींची सायबर पोलिसांकडे तक्रार
अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड आणि आमदार अमोल मिटकरील यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. व्हायरल व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी मोहोड यांच्या विरोधात सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिटकरी हे काम करुन देण्यासाठी पैसे उकळत असल्याचा थेट आरोप शिवा मोहोड यांनी केला होता. तसेच महिला पदाधिका-याचे प्रकरण काय आहे, असा सवालही मोहोड यांनी केला होता. पण अमोल मिटकरी यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून मोहोड यांना इशारा दिला आहे.
(हेही वाचाः राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? कार्यकारिणीच्या बैठकीतून शरद पवारांसमोरच अजित पवार निघून गेले)
मी घाबरत नाही- मोहोड
पण याबाबत शिवा मोहोड यांनी देखईल आक्रमक भूमिका घेतली आहे. मला मिटकरींनी पाच कोटींची नोटीस पाठवली आहे. इतके पैसे त्यांनी वर्षभरात कमावले. पण मी सुद्धा या नोटिसला भागरत नसून चोख उत्तर देईन. जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडायला मी मागे पुढे पाहणार नाही, अशा शब्दांत मोहोड यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community