विधान परिषदेत ‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’च पॉवरफुल, राष्ट्रवादीच्या आमदाराचे सूचक ट्वीट

100

राज्यातील राज्यसभा निवडणुकांच्या धक्कादायक निकालानंतर आता सोमवारी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकांचे सर्वांना वेध लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळणे फार महत्वाचे असून, ही निवडणूक एकप्रकारे मविआच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मविआतील तिन्ही पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्यसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेले बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे पुन्हे एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मविआतील नेत्यांसह भाजप नेत्यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे. या निवडणुकीत देवेंद्र पेक्षा हितेंद्र पॉवरफुल ठरणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः राज्यसभेत कोण फुटलं हे कळलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण)

मिटकरी यांचे ट्वीट

भाजप आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर आता मिटकरी यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र पेक्षा हितेंद्र पॉवरफुल ठरणार आहेत. तुम्ही कितीही लोटांगण घाला, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला इशारा दिला आहे.

नेत्यांच्या भेटीगाठी

शुक्रवारपासून महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. भाजप नेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन, मनीषा चौधरी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर,एकनाथ खडसे तसेच काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे.

(हेही वाचाः Agnipath Scheme: अग्निपथ योजनेची तयारी 1989 पासून, सैन्य दलाची माहिती)

हितेंद्र ठाकूरांची भूमिका महत्वाची 

बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील असे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही संख्या निवडणुकांमधील मतांच्या गणितासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहेत. ही निवडणूक गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडी आणि भाजपला आमदार फुटण्याची जोखीम पत्करता येणार नाही. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका यावेळीही महत्वाची असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.