इतकी संपत्ती कुठून आली?; बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला का दाखल केला, छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितले…

131

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुजबळांनी अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, फारूख अब्दुला यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

( हेही वाचा : पंजाब गुप्तचर विभागावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला मुंबईतून अटक; एटीएसची मोठी कारवाई )

इतकी संपत्ती आणली कुठून?

संघर्षमय प्रवासाचे वर्णन करताना छगन भुजबळ म्हणाले, पहाटे ३ वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो, माझ्या मोठ्या भावाने सुद्धा खूप कष्ट केले. भाजी आणून आम्ही माझगावच्या फूटपाथवर विकायचो. हळूहळू आमचा धंदा वाढला भाऊ ३ वाजता आणि मी ५ वाजता जायचो. आम्ही खूप कष्ट केले त्यानंतर आम्हाला मोठ्या कंपनीचे कॉंट्रॅक्ट मिळाले, असे सांगत भुजबळांनी एवढी संपत्ती कुठून आणली असे विचारणाऱ्या लोकांना स्पष्टीकरण दिले.

बाळासाहेब ठाकरेंविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला भुजबळांनी सांगितले कारण…

छगन भुजबळ म्हणाले, रमाबाई नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडरकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. यानंतर सामनामध्ये हाच तो नराधम हे वृत्त प्रश्नचिन्हाशिवाय आले. तर दुसरीकडे मला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्लिनचिट मिळाली. यामुळे बाळासाहेब ठाकरेंवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. यानंतर संजय राऊत आणि सुभाष देसाई चिठ्ठी घेऊन आले, तेव्हा “मी त्यांना विचारलं काय काम आहे?” ते म्हणाले, बाळासाहेबांचे वय झालंय, आजारीही असतात माझ्या लक्षात आलं मी म्हटलं थांबा आता काहीच बोलू नका. त्यांनी केसची तारीख सांगितली… मी न्यायालयात गेलो. न्यायाधीशांनी विनंती केली मला केस मागे घ्यायची आहे ते सुरूवातीला ऐकायला तयार नव्हते. असे सांगत भुजबळ म्हणाले शेवटी मी म्हणालो तुमचे पाय धरतो, केस मागे घ्यायची आहे तेव्हा केस मागे घेण्यात आली. यानंतर बाळासाहेबांनी मला फोन केला आणि पूर्ण कुटुंबाला मातोश्रीवर यायला सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान, छगन भुजबळांनी पहिली निवडणूक, विद्यार्थी ते शाखाप्रमुख या संपूर्ण प्रवासाची माहितीही दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.