NCP MLA Disqualification Cas : राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी आजपासून

NCP MLA Disqualification Cas : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ही, सुनावणी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

349
NCP MLA Disqualification Cas : राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी आजपासून
NCP MLA Disqualification Cas : राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी आजपासून
विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल (NCP MLA Disqualification Cas) लागल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदारांची अपात्रता सुनावणी आजपासून सुरू होत आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्यासमोर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ही, सुनावणी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेत ९ आमदार असून त्यापैकी ३ आमदार शरद पवार यांच्याकडे, तर ६ आमदार अजित पवार गटाकडे आहेत. (NCP MLA Disqualification Cas)
राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. जयंत पाटील यांनी आमदार सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांच्याविरोधात, जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. आता उपसभापती डॉ. नीलम गोहे काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल. (NCP MLA Disqualification Cas)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.