राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदार अपात्रता याचिकेवर १५ जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. दोन्ही बाजूच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले. तसेच शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या तिन्ही याचिका आज अध्यक्षांनी फेटाळल्या. या निकालात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना अध्यक्षांनी हात घातला.
(हेही वाचा – NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजित पवारांचीच तर दोन्ही गटाचे आमदार पात्र)
- ‘पक्षाची घटना आणि बहुमत असल्यास पक्ष त्या पार्टीचा होतो’, असे म्हटले आहे. तसेच अध्यक्षांनी दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेवर विश्वास दर्शवला आहे.
- 30 जून रोजी 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानले आणि 30 जून रोजी दोन गट पडले होते. त्यामुळे अधिकृत तारीख ही 30 जून मानली जात आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही.
- 30 जून रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांची अध्यक्ष म्हणून निवड केली, त्यामुळे अजित पवार हे अध्यक्ष होतात. तरी अजित पवारांची निवडणूक ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही.
- 29 जूनपर्यंत कोणीही शरद पवार यांनी अध्यक्षपदी रहाण्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे 30 जून रोजी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही अध्यक्ष असे दोन दावे करण्यात आले.
- दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत, असा दावा केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community